मुंबईला अपुरी सुरक्षा- हायकोर्ट

December 19, 2008 1:26 PM0 commentsViews: 2

19 डिसेंबर, मुंबईमुंबईच्या सुरक्षा व्यवस्थेच्या मुद्यावर मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली. या सुनावणीत हायकोर्टानं मुंबईची सुरक्षा अपुरी असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. 26 नोव्हेंबरला झालेल्या अतिरेकी हल्ल्यात सरकारची कारवाई समाधानकारक नसल्याचंही कोर्टानं म्हटलंय. मुंबईच्या सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी एक समिती स्थापण्याचा आदेशही न्यायालयानं दिला. या समितीत 25 जणांचा समावेश असणार आहे. त्यात तीन प्रशासकीय अधिकारी, प्रत्येक क्षेत्रातले तज्ज्ञ आणि लोकप्रतिनिधी आपल्या सूचना मांडतील. याविषयावर 26 डिसेंबरला मंत्रालयात बैठक होणार आहे. या बैठकीनंतर चार आठवड्यांनी ही समिती आपला अहवाल न्यायालयात सादर करेल.

close