चव्हाण पुळचट मुख्यमंत्री -पिचड

November 5, 2012 2:12 PM0 commentsViews: 4

05 नोव्हेंबर

अजितदादांना आता आपल्याला खर्‍याअर्थाने मुख्यमंत्री करायचं आहे यासाठी आपल्याला कामाला लागायचं आहे. मग बोलू नका पुळचट असलेला मुख्यमंत्री कसा आणि नव्या तडफदार मंत्री कसा हे तुम्हीच पाहा. मग बघा तुमच्या महाराष्ट्राला कोणाची तोड नसणार नाही अशी जळजळीत टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षा मधुकर पिचड यांनी केली. ते नांदेडमध्ये बोलतं होते. पिचड यांच्या टीकेनंतर खुद्द राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काँग्रेसचा समाचार घेतला. गेल्या 2 वर्षांपासून मंत्रिमंडळ विस्ताराचं फक्त गाजर दाखवलं जातंय. मंत्रिमंडळ विस्ताराची फक्त चर्चा होते.पण त्यापुढे काही होत नाही अशा शब्दात पवारांनी काँग्रेसवर टीका केली.

close