सचिनला ‘ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया’प्रदान

November 6, 2012 3:08 PM0 commentsViews: 6

06 नोव्हेंबर

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या शिरपेचात आज आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. ऑस्ट्रेलियन सरकारचा मानाचा 'ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया' हा किताब सचिनला देण्यात आला आहे. मुंबईत झालेल्या एका शानदार सोहळ्यात ऑस्ट्रेलिया मंत्री सायमन क्रीन यांच्या हस्ते सचिनला पुरस्कार देण्यात आला. सचिनच्या क्रिकेटमधल्या योगदानाबद्दल त्याचा गौरव करण्यात आला. 'ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया' हा ऑस्ट्रेलियातला मानाचा नागरी किताब आहे. तर ऑस्ट्रेलिया बाहेरच्या व्यक्तींना हा किताब क्वचितच दिला जातो. 16 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधान ज्युलिया गिलार्ड यांनी याबद्दल घोषणा केली होती. ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया या किताबाने आतापर्यंत फक्त दोन भारतीयांना हा सन्मान मिळाला आहे. मात्र सचिन किताब देण्यावरून ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू मॅथ्यू हेडनने नाराजी व्यक्त केली होती. शतकांचा शतकवीर सचिनने 190 टेस्ट मॅचमध्ये 15,533 रन्स केले आहे. या व्यतिरिक्त सचिनच्या नावावर 463 एकदिवशीय आंतराष्ट्रीय सामन्यात 18,426 रन्स जमा आहे. त्यामुळे त्याच्या या कारकिर्दीची दखल घेतं ऑस्ट्रेलियन सरकारने हा किताब दिला आहे.

close