विजयानंतर ओबामांचं भाषण

November 7, 2012 11:42 AM0 commentsViews: 9

07 नोव्हेंबरआम्हाला एक सुरक्षित, आदरणीय राष्ट्र हवंय. आमच्याकडे जगातलं सर्वांत शक्तिशाली सैन्य आहे. इथे आत्मविश्वास, शांती आणि स्वातंत्र्य, हे सारं आहे. आम्हाला उदार आणि सहिष्णू अमेरिका हवी आहे. इथे स्थलांतरितांची स्वप्नंही पूर्ण होतात. मी गव्हर्नर रोमनी यांच्याशी फोनवरून बोललो, त्यांचं अभिनंदन केलं. त्यांच्यासोबत बसून मी देशातल्या समस्यांवर चर्चा करणार आहे. तुम्ही मला कृतीसाठी मतदान केलंय. त्यासाठी मी लवकरच सर्व पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करेन. वित्तीय तूट कमी करेन, करप्रणालीत बदल घडवेन, स्थलांतरितांसाठीचे नियम दुरुस्त करेन, परदेशातल्या तेलापासून अमेरिकेला मुक्त करेन.. खूप काम करायचंय. तुमची मेहनत करायची तयारी असेल तर तुम्ही कोण आहात, कसे आहात याला महत्त्व नाही. तुम्ही काळे आहात की गोरे, स्पॅनिश वंशाचे आहात की आशियाई की मूळ अमेरिकन, तरुण आहात की म्हातारे, श्रीमंत आहात की गरीब, धडधाकट आहात की विकलांग, समलिंगी आहात की स्ट्रेट, यामुळे काहीही फरक पडत नाही. आपण सारे अमेरिकन आहोत.

close