छोट्या मावळ्यांचा शिवबाचा किल्ला

November 8, 2012 7:58 AM0 commentsViews: 7

08 नोव्हेंबर

सगळीकडे दिवाळीची जय्यत तयारी सुरु असताना बच्चे कंपनी किल्ले बनवण्यात मग्न आहेत. शाळांना सध्या सुट्टी असल्यानं चिखल गोळा करण्यापासून ते छोटे-छोटे सैनिक जमवण्याचं काम ही लहान मुलं करत आहे. बाजारामध्ये प्लॅस्टिकचे रेडिमेड किल्ले आलेले असतानाही अनेक लहान मुलांनी मातीचेच किल्ले तयार करायला पसंती दिली आहे. त्यातच परीक्षा आणि अभ्यासाची काळजी घेत हे किल्ले बनवले जात आहे. या किल्यांवर छत्रपती शिवरायांसोबतच त्यांचे मावळेही विराजमान झाले आहे.

close