‘नको आता..बस्स…दारूला रामराम…’

November 8, 2012 5:46 PM0 commentsViews: 242

08 नोव्हेंबर

मी 12 वर्षांपासून दारू पीत होतो. अगोदर ताडी पीत होतो. मग दारूवर गेलो रोज दोन बाटल्या..नंतर मला त्रास सुरु झाला. जेवणं नाही ज्यायाचं…काविळ झाला…आता दम लागतो..लिव्हर खराब झालंय…आता पोटातलं पाणी काढण्यासाठी केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल झालोय..आता दारूला रामराम.. जगलो वाचलो तर मी लोकांनाही दारू सोडण्याचं सांगेल…पहा जमलं तर….ही व्यथा आहे कल्याण येथे राहण्यार्‍या किशोर राजगुरू यांची…

डॉ. अभय बंग यांनी केलेल्या दारुबंदीच्या मागणीवरुन सध्या महाराष्ट्रात दारुबंदीचा विषय पुन्हा चर्चेत आला. दारु… मग ती देशी असो की विदेशी… दारुच्या अति आहारी गेल्यामुळे त्यातले टॉक्सिन्स शरीरावर अनेक प्रकारचे दुष्परिणाम करतात. दारुची नशा इतकी चढते की, मजेसाठी पिणारी व्यक्ती ही पेशंट बनते आणि मग हा जीवन मरणाचा खेळ बनतो.

close