आंदोलकांमुळे नागपुरात डॉक्टारांच काम वाढलं

December 19, 2008 2:28 PM0 commentsViews: 1

19 डिसेंबर नागपूर अखिलेश गणवीरनागपूर अधिवेशनाला आता एक आठवडा झाला. अधिवेशनाच्या काळात इथे आंदोलनं, उपोषणं सुरू असतात. पण यात वेगळाच पेच निर्माण झाला आहे. मंत्री किंवा आमदारांची पावलं एकदातरी आपल्या मंडपाकडे वळावीत याची वाट पाहणारे आंदोलक आजारी पडत आहेत. आणि त्याचा भार सरकारी डॉक्टरांवर पडतआहे. उपोषण केल्यामुळे तरी मंत्र्यांच लक्ष आपल्याकडे जाईल, असं उपोषणकर्त्यांना वाटतं. अधिवेशनाच्यासमोर उपोषणाला बसणा-यांमुळे आता सरकारी दवाखान्यातल्या डॉक्टारांना नवं काम लागलं आहे. एखाद्या व्यक्तीची तब्येत ढासळली की त्याच्यावर लगेच उपचार करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. मंत्र्यांच, मीडियाच लक्ष आपल्याकडे जावं म्हणून इथल्या आंदोलकांनी जीव पणाला लावला आहे. आणि डॉक्टरांच्या कामाचे तासही.पण आरोपांच्या फैरी झाडण्यात गर्क असलेल्या राजकीय नेत्यांना त्यांच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही.

close