पुण्यात साखर आयुक्तांची गाडी पेटली की पेटवली ?

November 9, 2012 3:16 PM0 commentsViews: 35

09 नोव्हेंबर

एकीकडे उसाच्या दरवाढीसाठी राज्यभरात आंदोलनं पेटले असताना पुण्यात साखर आयुक्त विजय सिंघल यांची गाडी गुरुवारी रात्री पेटली. तसंच या गाडीच्या काचा फुटल्याचं आढळून आलंय. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली की ही आग लावण्यात आली याचा शोध आता पोलीस घेत आहे. साखर आयुक्तांच्या निवासस्थानाच्या आवारातच ही घटना घडली. शेतकरी संघटनेचं ऊस दरवाढीसाठी आंदोलन सध्या सुरू आहे. त्यामुळे कोणी मुद्दाम तोडफोड करुन आग लावली का याचा शोध आता घेतला जातोय.

close