बाळासाहेबांची प्रकृती स्थिर -राज ठाकरे

November 10, 2012 5:50 PM0 commentsViews: 41

10 नोव्हेंबर

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती स्थिर आहे. आताच त्यांनी सूप घेतलंय ते आराम करत आहे. उगाच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका बाळासाहेबांची तब्येत ठीक आहे अशी माहिती मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली. आज संध्याकाळी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मातोश्रीवर जाऊन बाळासाहेबांच्या तब्येतीची विचारपुस केली. बाळासाहेबांची भेट घेतल्यानंतर राज ठाकरे यांनी मातोश्रीबाहेर माध्यमांशी संवाद साधला.

close