नाशिककराने तयार केलं महाकाय आकाशकंदील

November 12, 2012 12:34 PM0 commentsViews: 54

12 नोव्हेंबर

नाशिकमधले चित्रकार प्रसाद पवारनं महाकाय आकाशकंदील साकारला आहे. लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये या कंदीलची नोंद झाली असून या देखण्या आकाशकंदिलाची पाहणी गिनिज बुकच्या टीमने केली आहे.. जगातील सगळ्यात मोठा आकाश कंदील म्हणून लवकरच नाशिकच्या या कंदिलाची नोंद गिनीज बुकमधे होणार आहे. 108 फूट उंच आणि 40 फूट रुंद असलेला हा आकाशकंदील बनविण्यासाठी 120 किलो लोखंड, 170 मीटर लांब कापड वापरण्यात आलंय. शहरातील गोल्फ क्लब मैदानावर लावण्यात आलेला हा आकाशकंदील पाहण्यासाठी लोकांची मोठ्या संख्येनं गर्दी होत आहे. विशेष म्हणजे जगातील सगळ्यात लहान आकाशकंदील तयार करण्याची नोंदही प्रसाद पवार यांच्या नावावर आहे.

close