सवलतींसाठी नागपुरात कुंभार समाजाचं आंदोलन

December 19, 2008 3:03 PM0 commentsViews: 22

19 डिसेंबर नागपूरअन्वर शेखआपापल्या जातीला राखीव जागा मिळाव्या. तसेच ज्यांना सवलती मिळाल्या त्यांना आणखी कनिष्ठ जातीच्या सवलती हव्या असतात. त्याकरिता आंदोलन, बंद यासारखे प्रकार केले जातात. अशा आंदोलनापासून कुंभार समाजही मागे नाही. ओबीसींच्या सवलती मिळत असलेल्या कुंभार समाजाला आता भटक्या विमुक्त जातींचा दर्जा हवा आहे. त्यासाठी या समाजाच्या काही कार्यकर्त्यांनी थेट विधीमंडळावर धडक मारली. सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी विधीमंडळासमोर चक्क चाक मांडून त्यावर मडकी बनवणारे कुंभार समाजाचे कार्यकर्ते आंदोलन करत आहेत.तेही मडकी बनवून. कुंभार समाजाची मागणी आहे की त्यांना ओबीसीमधून वगळावं आणि भटक्या विमुक्त जातीमध्ये ठेवावं. कंुभार समाज महासंघाचे अध्यक्ष, सुरेश हिरे सांगतात, वाढत्या महागाईचा फटका कुंभार समाजालाही बसतोय. रंगांचे भाव वाढत आहेत. त्यामुळे मडक्यांच्या किमती वाढल्या आहेत. किमती आटोक्यात ठेवण्यासाठी सरकारनं कुभारांना माती द्यावी अशा आमच्या मागण्या आहेत.आपल्या मागण्या मंजूर होत नाही तोपर्यंत नागपुरातच ठिय्या देणार असा या कार्यकर्त्यांचा निर्धार आहे.

close