मुंबईत शुकशुकाट ; दुकानं बंद

November 15, 2012 7:16 AM0 commentsViews: 13

15 नोव्हेंबर

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती गंभीर असल्याची बातमी कळताच बुधवारी रात्री शिवसैनिकांनी मातोश्रीकडे धाव घेतली होती. अजूनही मातोश्रीबाहेर शिवसैनिक मोठ्या संख्येनं हजर आहे. सकाळ होताच मुंबईत सर्वत्र शुकशुकाट पसरला होता. अनेक दुकानदार, व्यापार्‍यांनी आपली दुकानं बंदच ठेवली आहे. दादर, परळ,वरळी, लालबाग आणि बांद्रा भागात बंद पाळण्यात येत आहे. तर रस्त्यांवर तुरळक गर्दी आहे. मुंबईभरात उत्सफुर्तपणे बंद पाळण्यात आलाय तर गोरेगाव फिल्मसिटीत सुद्धा चित्रपट आणि मालिकांचं चित्रिकरण बंद करण्यात आलंय. खबरदारी म्हणून मातोश्रीबाहेरच्या बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. पोलिसांबरोबरच रॅपिड ऍक्शन फोर्सचे जवानही तैनात करण्यात आलेत. याबद्दल सांगतोय आमचा सीनिअर करस्पाँडंट सुधाकर काश्यप…

close