बाळासाहेबांच्या प्रकृतीसाठी मनसे कार्यकर्त्यांचं बाप्पाला साकडं

November 15, 2012 1:30 PM0 commentsViews: 26

15 नोव्हेंबर

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या प्रकृतीत फरक पडावा यासाठी शिवसैनिकांनी ठिकठिकाणी प्रार्थना सुरू केल्या आहेत. पुण्यात मनसेच्या कार्यकर्त्यांनी दगडूशेठ हलवाई गणेश मंदिरात आरती केली. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रकृती सुधारावी यासाठी बाप्पाला साकडं घातलं आहे. तर ठाण्यात महामृत्यूंजय जप करण्यात येत आहे. अंबरनाथमधील शेकडो शिवसैनिकांनी आज सकाळी गणपती मंदिर आणि गजाननमहाराज मंदिरात बाळासाहेबांसाठी प्रार्थना केली. तसंच पिंपरी चिंचवडमध्येही बाळासाहेबांच्या स्वास्थ्यासाठी प्रार्थना करण्यात येत आहे. तर दुसरीकडे अहमदनगर इथल्या शिवसैनिकांनी गणरायाला साकडं घातलं. इथल्या पावन गणपती मंदिरात कार्यकर्त्यांनी महाआरती केली. बाळासाहेबांना दिर्घायुष्य लाभावं तसंच ते आजारपणातून लवकरात लवकर बाहेर यावे अशी प्रार्थना यावेळी शिवसैनिकांनी केली.

close