श्रीलंकेनं पाकिस्तान दौ-याचं आमंत्रण स्वीकारलं

December 19, 2008 4:48 PM0 commentsViews: 2

19 डिसेंबर भारताने पाक क्रिकेट दौ-याला नकार दिल्यानं पाकिस्तान क्रिकेट बोर्डासमोर मोठा प्रश्न ऊभा राहिला होता. पण त्यांना आता काहीसा दिलासा मिळाला आहे. कारण श्रीलंकेनं पाकिस्तान दौ-याचं आमंत्रण स्वीकारलं आहे. पीसीबीची आर्थिक विवंचना त्यामुळे तात्पुरती जरी मिटली असली तरी भारत आणि बीसीसीआयवरचा त्यांचा राग मात्र काही कमी झालेला नाही. पाकिस्तानचं 3 टेस्ट, 3 वन डे मॅच आणि एक 20-20ची मॅच खेळण्याचं आमंत्रण श्रीलंकेनं स्वीकारल्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डावरचं दडपण बरचंस दूर झालं असेल.भारताने पाक दौ-यातनं माघार घेतल्यामुळे पीसीबीला साडे दहा कोटी रुपयांचं नुकसान सहन करावं लागणार होतं. पण घाई-घाईत आयोजित केलेला श्रीलंकेचा दौरा नुकसान भरून काढेल अशी त्यांना आशा वाटते.

close