गेहलोत मंत्रिमंडळातल्या राबडी देवी

December 19, 2008 5:03 PM0 commentsViews: 4

19 डिसेंबर जयपूरगोलमा देवी राजस्थानमध्ये नुकत्याच निवडणुका झाल्या.त्यात काँग्रेसचं सरकार सत्तेत आलं.अशोक गेहलोत मुख्यमंत्री झाले.या अशोक गेहलोतांच्या मंत्रिमंडळात एक राबडी देवी आहेत. गेहलोतांच्या मंत्रिमंडळात राबडीदेवी. चमकलात ना? पण हे खरं आहे. गेहलोत यांच्या नव्या मंत्रिमंडळातल्या गोलमादेवी या राबडीच्याच भगिनी शोभतात.गोलमा देवी यांनी महुआ मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि गेहलोत यांना पाठिंबा दिला.गोलमा देवी जेव्हा मंत्री म्हणून शपथ घ्यायला स्टेजवर गेल्या तेव्हां त्यांना फक्त एकच वाक्य बोलता आलं.मैं गोलमा देवी बोल रही हूँ इतकच.मोठ्या मुश्किलीने त्यांनी शपथपत्रावर सही केली.पण शपथ घेता आली नाही म्हणून काय झालं गोलमा देवींना काय करायचं ते चांगलं माहित आहे. किरोडीमल मीना हे गोलमा देवींचे पती.ते स्वत: अपक्ष आमदार आहेत.ते स्वत:ला मंत्रीपती मानतात.गोलमा देवींच्यावतीने आता तेच कारभार सांभाळणार आहेत. तर अशा या गेहलोत सरकारमधल्या राबडी देवी म्हणजेच गोलमा देवी. ज्यांना ना धड वाचता येत, ना लिहीता येत, ना बोलता येत.तरीही आता त्या मंत्री होऊन जनतेच्या भवितव्याचे निर्णय घेणार आहेत.

close