कसाबला शेवटी वकील मिळाला

December 19, 2008 5:32 PM0 commentsViews: 1

19 डिसेंबर मुंबईमुंबई दहशतवादी हल्ल्यात अटकेत असलेला दहशतवादी अजमल कसाब याला शेवटी वकील मिळाला आहे. अ‍ॅड. के. लॅम यांनी आज मुंबई पोलीस मुख्यालयामध्ये कसाबचं वकीलपत्र दाखल केलं. या वकीलपत्रावर आता कसाबच्या स्वाक्षरीची आवश्यकता आहे. वकीलपत्र घेण्याच्या मुद्यावरच काही दिवसांपूर्वी शिवसैनिकांनी अ‍ॅड. लॅम यांच्या घरावर हल्ला केला होता. वकील न मिळाल्यास कसाबची 90 दिवसानंतर सुटका करावी लागणार आहे. हे अ‍ॅड. लॅम यांनी स्पष्ट केलं होतं. कसाबला न्यायालयानं कितीही कठोर शिक्षा दिली.तरी पोलीस कोठडीत त्याला मारहाण होऊ नये असा त्यांचा प्रयत्न आहे.दहशतवादी कसाबचं वकीलपत्र अ‍ॅड. के लॅम यांनी घेतलं असलं तरी त्यावर कसाबची स्वाक्षरी होणे अजून बाकी आहे.

close