गुप्तता पाळली म्हणून कसाबला फाशी झाली -शिंदे

November 21, 2012 1:05 PM0 commentsViews: 16

21 नोव्हेंबर

गुप्तता यासाठीच बाळगली की, देशभरातील घटनांवर विविध संघटना लक्ष ठेवून आहे. ही माहिती जर बाहेर आली असती तर कोर्टाकडून, सामाजिक संस्थांकडून यात अडथळा आणला गेला असता. मी महाराष्ट्रातून इथं केंद्रीय गृहमंत्रीपदावर आलो आहे. मला राज्यात काय होऊ शकतं आणि काय होऊ शकतं नाही याची पुर्ण जाणीव आहे. म्हणून ऑपरेशन X बदल गुप्तता पाळली आणि ते यशस्वी झालं अशी कबुली केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिली. तसंच पोलीस प्रशासन आणि न्यायालयीन प्रक्रियातील संवाद हा गुप्तच राहिला पाहिजे असंही शिंदे यांनी ठणकावून सांगितलं. ऑपरेशन एक्सच्या यशानंतर सुशिलकुमार शिंदे यांनी सर्वात पहिली मुलाखत आयबीएन लोकमतला दिली. या मुलाखतीत ते बोलत होते.

ऑक्टोबर महिन्यात कसाबच्या फाशीबद्दलची फाईल आमच्या खात्यात आली होती तेंव्हा मी रोमला इंटरपोलच्या परिषदेत होतो. भारतात परतल्यानंतर माझ्या हातात राष्ट्रपती भवनातून एक टॉप सिक्रेट फाईल आली. ति फाईल होती कसाबच्या फाशीवर शिक्कामोर्तब करण्याची. मीही तातडीने त्यावर सही केली आणि पुढील कारवाईसाठी राज्य सरकारला पाठवून दिली. या फाईलमध्ये 21 नोव्हेंबर हा दिवस फाशीसाठी न्यायाधीशांनी तय करण्यात आला होता. 8 नोव्हेंबरला ही फाईल राज्यसरकारकडे सोपवण्यात आली आणि याबद्दल गुप्तता पाळण्यासाठी सुचना देण्यात आल्या. सरकारने कमालीची गुप्तता बाळगली यातली एकही बाब बाहेर पडली नाही याबद्दल राज्य सरकारचं खरंच कौतुक करण्यासारखं आहे. भारतात आज अनेक संघटना आहे. बाहेरच्या काही संघटना लक्ष ठेवून असतात. यातून कोणताही अडथळा शकला असता. म्हणून गुप्तता बाळगली आणि ऑपरेशन एक्स यशस्वी झालं. आम्ही पाकिस्तानला काल याबद्दल पत्र,फॅक्स सुद्धा पाठवला पण त्यांनी त्याचं उत्तर दिलं नाही. त्यांचं उत्तर न येणं हे अपेक्षित होतं. आज आपल्या न्यायप्रणाली आणि पोलीस दलाने जी भुमिका बजावली ही दशहतवाद्याना एक धडा आहे. आमची न्यायप्रणाली भक्कम आहे.त्यावर आमचा पुर्ण विश्वास आहे. दहशतवाद्यांना हा इशारा आहे असं सुशिलकुमार शिंदे यांनी ठणकावून सांगितलं.

close