शहीद सहकार्‍यांना सॅल्यूट -विश्वास नांगरे-पाटील

November 21, 2012 5:58 PM0 commentsViews: 205

21 नोव्हेंबर

आज मला शहीद हेमंत करकरे, विजय साळसकर, अशोक कामटे, तुकाराम ओंबळे यांची आठवण येतेय. आज त्यांना माझा सॅल्यूट. या प्रकरणाचा अधिकार्‍यांनी चांगला तपास केला.ऑपरेशन एक्स यशस्वीरित्या पार पडले यामुळे पुर्णविराम मिळाला आहे. पण हा पुर्णविराम नाही अर्धविराम आहे. आता आपणं मैलाचा दगड गाठलेला आहे. अजून आपल्याला खूप तयारी करायची आहे. जी मागे तयारी केली आहे तशीच तयारी करायची आहे. आम्ही यासाठी सज्ज आहोत पण सर्व नागरीकांनी उघडे डोळे ठेवून जागृक राहणे गरजेचं आहे अशी प्रतिक्रिया अतिरिक्त पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिली.

close