अनिल कुंबळे आता दिसणार नव्या भूमिकेत

December 19, 2008 6:21 PM0 commentsViews: 5

19 डिसेंबर भारताचा माजी टेस्ट कॅप्टन अनिल कुंबळे आता एका नव्या रोलमध्ये दिसणार आहे. कुंबळेचा वर्ल्ड अ‍ॅन्टी डोपिंग एजन्सी म्हणजे वाडाच्या स्टॅण्डिंग कमिटीमध्ये समावेश करण्यात आला आहे. वाडाच्या अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या 16 जणांच्या यादीत कुंबळेचा समावेश करण्यात आला आहे. भारताच्या या स्पिनरनं गेल्या महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या 3-या टेस्ट मॅचनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधुन निवृत्ती स्वीकारली होती.आंतरराष्ट्रीय टेस्टमध्ये 619 विकेट घेणारा तो एकमेव भारतीय आहे.अनिल कुंबळे 1 जानेवारीपासून या नवीन पदाची जबाबदारी सांभाळेल. तर रशियाचे व्हिआचेसलाव्ह फेतीसोव्ह या वाडा कमिटीचे प्रमुख असतील.

close