माथेरानची मिनी ट्रेन झाली हायटेक

November 22, 2012 1:15 PM0 commentsViews: 3

22 नोव्हेंबर

माथेरानच्या सौदर्याचा आस्वाद घेण्यासाठी महत्वाची भुमिका बजावणारी मिनी ट्रेन आता आधुनिक झाली आहे. या ट्रेनच्या एका डब्याला मोठ्या खिडक्या ठेवण्यात आल्या आहे. सुंदर पडदे लावण्यात आले आहे. तसेच ट्रेनच्या मागील आणि समोरील बाजूस कॅमेरा लावण्यात आला. या कॅमेर्‍यातून माथेरानचं निसर्गसौंदर्य टिपण्यात येऊन ते ट्रेनमधील टीव्हीवर दिसणार आहे. त्यामुळं आता ट्रेनमध्ये बसूनच निसर्गसौदर्यांचा आनंद घेता येणार आहे. या डब्यात एकूण 6 सीट असून तो फॅमिलीसाठी बुक करता येणार आहे. मात्र यासाठी 1,175 रुपये मोजावे लागणार आहे.

close