राम गोपाल वर्मांचा 26/11 वर सिनेमा येतोय

November 23, 2012 5:09 PM0 commentsViews: 24

23 नोव्हेंबर

26/11 च्या मुंबई हल्ल्यावर आधारित राम गोपाल वर्माचा बहुचर्चित 'द अटॅक ऑफ 26/11' हा सिनेमा लवकरच येतोय. या सिनेमाचा फर्स्ट लूक आज दाखवण्यात आला. यात नाना पाटेकर यांनी राकेश मारिया यांची तर संजीव जयस्वाल या अभिनेत्याने कसाबची भूमिका केली आहे. 26/11 हल्ल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख ताज हॉटेलची पाहणी करायला गेले होते. त्यावेळी रामगोपाल वर्माही त्यांच्यासोबत होते. त्यावरून बरंच वादंग झाला होता. त्यानंतर विलासराव देशमुख यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. या प्रकारानंतर 26/11 वर चित्रपट बनवणार नाही असं रामगोपाल वर्मा म्हटलं होतं. पण तब्बल 4 वर्षांनी रामूचा हा चित्रपट पूर्णपणे तयार आहे.

close