बाळासाहेबांच्या अस्थिंचं अरबी समुद्रात विसर्जन

November 23, 2012 12:11 PM0 commentsViews: 28

23 नोव्हेंबर

दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मुख्य अस्थिकलशातल्या अस्थींचं आज शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंच्या हस्ते अरबी समुद्रात विसर्जन करण्यात आलं. यावेळी ठाकरे कुटुंबीयांसह शिवसेनेचे अनेक ज्येष्ठ नेतेही हजर होते. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंही यावेळी उपस्थित होते. दरम्यान, नाशिकच्या गोदावरी नदीत बाळासाहेबांच्या अस्थींचं विसर्जन करण्यात आलंय. सेनेच्या नाशिकमधल्या पदाधिकार्‍यांनी त्यासाठी रामकुंडावर तयारी केली होती. गंगाघाटापर्यंत विसर्जनावेळी मोठ्या संख्यानं नाशिककर सहभागी झाले होते.बाळासाहेबांच्या अस्थिंचं आज चंद्रभागेत विसर्जन करण्यात आलं. तसेच नेहमी हरिनामाच्या जयघोषानं दुमदुमणारं चंद्रभागेचं वाळवंट आज 'बाळासाहेब अमर रहे'च्या घोषणांनी दणाणलं. अस्थी विसर्जनाच्यावेळी वातावरण भावूक झालं होतं.

close