ग्रामपंचायत निवडणुकीत सदस्यांना हेलिकॉप्टरने परवास

November 26, 2012 11:24 AM0 commentsViews: 47

26 नोव्हेंबर

देशातल्या निवडणुका महाग झाल्यात असं म्हटलं जातंय. त्याचा प्रत्यय आज मुंडेगावच्या ग्रामपंचायत निवडणुकीत आला. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीमधील मुंडेगावच्या ग्रामपंचायतीच्या 7 सदस्यांना मुंबईहुन चक्क हेलिकॉप्टरनं गावात आणण्यात आलं. हा पराक्रम केला शिवसेनेच्या पॅनलचे प्रमुख चंद्रकांत गातीर यांनी. गावातलं राजकारण सुरु झालं की कोणकोणत्या गोष्टी घडू शकता आणि घडू शकत नाही याचं हे चमत्कारी उदाहरण. ग्रामपंचायत निवडणुकीत आपलं पॅनल फुटू नये म्हणून संपुर्ण 7 सदस्यांना त्यांनी अगोदर राजस्थानला हलवलं. पण त्यांच्या विरोधी पॅनलनं माघार घेतल्यानं चंद्रकांत गातीर यांचं पॅनल विजयी झालं. आता पॅनल विजयी झालं म्हणून सदस्य आहे कुठे प्रश्न निर्माण झाला. एखाद्या पक्षाचा राष्ट्रीय नेता जसा प्रचाराला हेलिकॉप्टरने गावात एंट्री करतो तशाच थाटात आज सकाळी सर्व सात सदस्यांना गातीर यांनी हेलिकॉप्टरनं घेऊन गावात आले. मुंडे गावात पहिल्यांदाच हेलिकॉप्टर आल्यानं गावकरीही अवाक् होऊन पाहत राहिले. पण एवढं मात्र नक्की नाशिकमधलं हे छोटस गाव या करामतीमुळे संगळ्यांच्या चर्चेत आलं.

close