…तर नारायण राणे महाराष्ट्रात दिसलाही नसता -राणे

November 26, 2012 2:20 PM0 commentsViews: 61

26 नोव्हेंबर

आज मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघानं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शोकसभेचं आयोजन केलं होतं. यावेळी पूर्वीश्रमीचे शिवसैनिक आणि आताचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ आणि नारायण राणे यांच्यासह अनेक पत्रकारांनी बाळासाहेबांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी बाळासाहेबांमुळे आपण घडलो अशी कबुली छगन भुजबळ आणि नारायण राणे यांनी दिली. बाळासाहेब हे आपलं दैवत होतं, पण शिवसेना हा आपला आज भूतकाळ आहे तर काँग्रेस हे आपलं भविष्य आहे अशा भावना राणेंनी व्यक्त केल्या. तर बाळासाहेबांनी आपल्याला सर्व काही दिलं. माणूस म्हणून घडवलं अशा भावना भुजबळांनी व्यक्त केल्या. तर आपण मुख्यमंत्री कसे झालो याची आठवणही राणेंनी सांगितली.

close