84 वर्षांचा तरूण खेळाडू !

November 27, 2012 5:18 PM0 commentsViews: 19

अद्वैत मेहता, पुणे

27 नोव्हेंबर

व्यायाम आणि फिटनेसला महत्व दिलं तर माणूस काय पराक्रम करू शकतो याचं जितं-जागतं उदाहरण आहे पुण्यातील 84 वर्षाचे शंभुराव देशपांडे.. गेल्या 22 वर्षात 11 विविध देशांमधील आशियाई मैदानी स्पर्धांमध्ये शंभुराज यांनी तब्बल 26 पदकं मिळवली आहे. 10 बाय 10 च्या एका छोट्याशा खोलीत राहणारे शंभुराव पेन्शनमधून मिळणार्‍या पैशातून स्पर्धांमध्ये सहभाग घेतात हे विशेष…

तरुणालाही लाजवेल असा हा सळसळता उत्साह आहे खेळाडू शंभुराव देशपांडे यांचा. वयाच्या 84 व्या वर्षी माणसांना काठीचा आधार लागतो पण शंभुराव या वयात देश-विदेशातली मैदानं गाजवताहेत.

पोस्टातून निवत्त झाल्यानंतर शंभुरावांनी आपल्या खेळातल्या करिअरला सुरुवात केली. 10 बाय 10 च्या खोलीतली त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सर्धांमध्ये मिळवेलेली 99 पदकं, सर्टीफिकेट्स आणि फोेटोग्राफ्स त्यांच्या कर्तृत्वाची साक्ष देतात.

पुण्यातील पर्वती आणि वेताळ टेकड्यांवर सकाळी फिरायला जाणं हाच शंभुराव यांचा सराव. त्यांनी ही पर्वती अवघ्या तीन मिनिटात चढून जाण्याचा पराक्रमही केलाय. पण सरकारनं त्यांच्या कर्तृत्वाकडं दुर्लक्ष केल्याची त्यांना खंत आहे.

आता त्यांची नजर आहे..फेब्रुवारीत होणार्‍या आशियाई स्पर्धेवर..या स्पर्धेत पदक मिळवून त्यांना पदकांची सेंचुरी मारायचीय. त्यांचं हे कर्तृत्व निवृत्तीनंतर काय या प्रश्नात गुरफटलेल्यांसाठी प्रेरणादायी आहे.

close