26/11 प्रकरणी दोषी अधिकार्‍यांवर कारवाई करा- विलासराव देशमुख

December 20, 2008 4:38 AM0 commentsViews: 8

20 डिसेंबरमुंबईवरील दहशतवादी हल्ल्याबद्दल दोषी अधिकार्‍यांवरही कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी केली आहे. मुंबई हल्ल्याप्रकरणी नैतिक जबाबदारी स्वीकारत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामे दिले. पण उच्च अधिकार्‍यांवर मात्र कोणतीच कारवाई झाली नाही. पोलीस महासंचालक, मुंबई पोलीस कमीशनर आणि गृहसचिव यांच्या हकालपट्टीची मागणी विरोधकांनी केली आहे. विरोधकांच्या आक्रमक भूमिकेमुळे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी अखेर या अधिकार्‍यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. आता विलासरावांनीही विरोधकांची भूमिका उचलून धरल्यामुळे या अधिकार्‍यांच्या चौकशीकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे.

close