देवकर अप्पा,शेतकर्‍यांना लूटलं त्याचं काय ?

November 28, 2012 1:50 PM0 commentsViews: 9

28 नोव्हेंबर

देवकर अप्पा, या अगोदर शेतकर्‍यांना 23 टक्के कर्ज मिळत होतं पण आता शेतकर्‍यांना नुसतं लूटलंय.अरे बाबा, त्यावेळेस रिझर्व्ह बँकेचं धोरण होतं. त्याप्रमाणं त्यांनी केलं.दुसर्‍या कोणी दिलं असतं का ? ज्यांनी कोणी मदत केली त्यांचे आभार मानावे हे ध्यानात ठेवा. जास्त बोलू नका.देवकर अप्पा, आपले विधान मागे घ्या इथं शेतकरी लोकं आली आहे. शेतकर्‍यांची दौलत फार मोठी हाय.असं असेल तर काळजी करू नका आमचं सरकार आणखी 25 वर्ष सत्तेवर असणार आहे काळजी करायचं कामं नाय हा संवाद आहे जळगावचे पालकमंत्री गुलाबराव देवकर आणि स्थानिक शेतकर्‍यांचा.

जळगाव जिल्ह्यात चोपडा साखर कारखान्याच्या गाळप हंगामाच्या कार्यक्रमात पालकमंत्री गुलाबराव देवकर यांना शेतकर्‍यांनी विरोध केला. जिल्ह्यात ऊसाला दर मिळत नसल्यानं आणि जिल्हा बँकेकडून कर्ज मिळत नसल्याचं सांगून शेतकर्‍यांनी देवकरांना विरोध केला. त्यांना शेतकर्‍यांनी भाषण करू दिलं नाही. यातच पालकमंत्र्यांचा तोल ढासळल्याने त्यांनी शेतकर्‍यांशी हुज्जत घालायला सुरवात केली. शेतकर्‍यांनी काहीही केलं तरी आमचं सरकार अजून 25 वर्षे राहणार अशी मुक्ताफळंही मंत्रिमहोदयांनी उधळली आहेत.

close