अजितदादांचं ‘नो कमेंट’

November 30, 2012 1:16 PM0 commentsViews: 8

30 नोव्हेंबर

अखेर सिंचनावरची श्वेतपत्रिका गुरुवारी मंत्रिमंडळात सादर झाली. तर दुसरीकडे आता अजित पवार यांना मंत्रिमंडळात परत घ्या अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलीक यांनी केली. आज अजित पवार पुण्यात होते यावेळी त्यांना श्वेतपत्रिका बाबत विचारले असता ते म्हणाले, मी अजून ती वाजली नाही त्यामुळे काही बोलणार नाही. पण मंत्रिमंडळात परत येणार का असा सवाल केला असता अजितदादांनी 'नो कमेंट' असं उत्तर दिलं. पण आपल्या नियोजित कार्यक्रमात अजितदादांनी तरूणांना राजकारणात येण्याऐवजी व्यवसाय करावा असा सल्ला दिला. तसंच आजच राजकारण फार खर्चिक झालं आहे. लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहे लोकांचा पक्षांवरून विश्वास उडाला आहे असा खेदही व्यक्त केला.

close