आरती कुलकर्णी यांना ‘सँक्च्युरी वाइल्डलाइफ’ पुरस्कार प्रदान

November 30, 2012 5:37 PM0 commentsViews: 22

30 नोव्हेंबर

आयबीएन लोकमतच्या डेप्युटी फीचर्स एडिटर आरती कुलकर्णी यांना सँक्च्युरी वाइल्डलाइफ ऍवॉर्ड प्रदान करण्यात आला आहे. 'आयबीएन लोकमत'वरून पर्यावरणाबद्दल वेळोवेळी केलेल्या कव्हरेजसाठी हा पुरस्कार त्यांना देण्यात आलाय. मुंबईत झालेल्या एका दिमाखदार कार्यक्रमात वनविभागाचे सचिव प्रवीण परदेशी यांच्या हातून त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. वाघांच्या संवर्धनासाठी उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्र राज्याला 'बेस्ट टायगर स्टेट' पुरस्कार देण्यात आला. तसंच चंद्रकांत वाकणकर यांना ग्रीन टिचर ऍवॉर्ड आणि पेंच व्याघ्रप्रकल्पाचे फिल्ड डायरेक्टर श्रीनिवास रेड्डी यांना पर्यावरण रक्षणाचा पुरस्कारही प्रदान करण्यात आले. यावेळी पर्यावरणतज्ज्ञ बिलिंडा राइट यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला.

close