भारतासमोर सर्व पर्याय खुले – प्रणव मुखर्जी

December 20, 2008 4:40 AM0 commentsViews: 2

20 डिसेंबर, गंगटोकपाकिस्तानवर लष्करी कारवाईचा भारताचा उद्देश नाही, या स्पष्टीकरणावर परराष्ट्रमंत्री प्रणव मुखर्जी आता माघार घेत असल्याचं दिसत आहे. पाकिस्ताननं दहशतवादी कारवायांना पाठिंबा न देण्याचं आश्वासन पाळावं. नाहीतर भारताससमोरचे सर्व पर्याय खुले असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. ते गंगटोकमध्ये बोलत होते. गंगटोकमधल्या सिक्कीम विद्यापीठात आयोजित दक्षिण आशिया परिषदेस त्यांनी दिल्लीतून संबोधित केले. त्यावेळी त्यांना पाकिस्तानला कडक संदेश दिला. पाकिस्ताननं दहशतवादाला पायबंद घालण्यासाठी आजवर दिलेल्या आश्वासनांची कधीच पूर्तता केली नसल्याचं ते म्हणाले. पाकिस्तान दहशतवादाला कसं खतपाणी घालतंय त्याचं मुंबई हल्ला हे ताजं उदाहरण असल्याचं मुखर्जी यांनी सांगितलं.

close