कर्मकांडावर माझाही विश्वास नाही -उद्धव ठाकरे

December 7, 2012 3:58 PM0 commentsViews: 3

07 डिसेंबर

कर्मकांडावर बाळासाहेबांप्रमाणेच माझाही विश्वास नाही पण लोकरुढींप्रमाणे मलाही त्यांच्या निधनानंतर क्रीयाकर्म करावी लागली असं मत शिवसेनाकार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं. या सभेत जानेवारीत राज्यव्यापी दौरा करणार असल्याचंही उद्धव यांनी जाहीर केलं. रत्नागिरीतल्या शिवसेना पदाधिकार्‍यांच्या मेळाव्यात उध्दव ठाकरे बोलत होते. विधानसभेवर भगवा फडकवण्याचं आवाहन शिवसैनिकांना करतानाच जानेवारीमध्ये सुरू होणार्‍या आपल्या राज्यव्यापी दौर्‍यामध्ये आजच्या सत्ताधार्‍यांनी महाराष्ट्राची केलेली दुर्दशा आपण जनतेसमोर मांडणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय.

close