मोहाली टेस्टमध्ये राहुलची द्रविडची सेंच्युरी

December 20, 2008 5:54 AM0 commentsViews:

20 डिसेंबर, मोहालीमोहाली टेस्टमध्ये राहुल द्रविडची सेंच्युरी हे दुसर्‍या दिवसाच्या पहिल्या सेशनचं वैशिष्ट्य ठरलं आहे. द्रविडने आज आपली 26वी सेंच्युरी पूर्ण केली आहे. इंग्लंड विरुद्धची ही त्याची चौथी सेंच्युरी. तर यावर्षातली फक्त दुसरी. यापूर्वी मार्चमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चेन्नईत द्रविडने सेंच्युरी ठोकली होती. पण त्यानंतर त्याचा फॉर्म हरवला. मागच्या नऊ महिन्यात त्याला फक्त दोन हाफ सेंच्युरी करता आल्या होत्या. आज मात्र द्रविडने हे अपयश धुवून काढलं. 261 बॉल्सचा मुकाबला करत त्याने तेरा फोर मारले. सेंच्युरी बरोबरच गौतम गंभीर बरोबर दुसर्‍या विकेटसाठी त्याने दोनशे रन्सची पार्टनरशिप केली आहे. इंग्लंडच्या कोणत्याच बॉलरना या जोडीने दाद दिली नाही. भारतीय टीमची आता मोठ्या स्कोअरकडे वाटचाल सुरु आहे.

close