नामांतर प्रश्नी भाजप गप्प;मनसे,काँग्रेसचा विरोध

December 10, 2012 2:49 PM0 commentsViews: 5

10 डिसेंबरशिवाजी पार्कच्या नामांतराचा वाद चिघळला आहे. या प्रकरणी शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेतलीय. शिवाजी पार्कचं नाव शिवतीर्थ करावं अशी शिवसेनेची मागणी आहे. बहुमताच्या जोरावर महापालिकेत शिवाजी पार्कचं शिवतीर्थ करू, असं महापौर सुनील प्रभू यांनी म्हटलंय. तर शिवसेनेचा मित्रपक्ष भाजपने या प्रकरणी चुपी साधली आहे तर मनसे आणि काँग्रेसनं मात्र विरोध दर्शवला आहे. आमचा कोणत्याही नामांतराला विरोध आहे. कारण नामांतर झालं तरी विकास होत नाही. गेली 17 वर्ष शिवसेनेची सत्ता असताना सुद्धा खुद्द बाळासाहेब ठाकरे यांनी हा विषय कधीच काढला नाही. आता त्यांच्या नावावर शिवसेनेकडून राजकारण होत आहे असी टीका मनसेचे नगरसेवक संदीप देशपांडे यांनी केली आहे.

close