धक्कादायक:मुंबईमध्ये वर्षभरात 207 बलात्काराच्या घटना

December 10, 2012 4:26 PM0 commentsViews: 51

सुधाकर काश्यप, मुंबई

10 डिसेंबर

मुंबईत महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये सतत वाढ होतेय. गेल्या वर्षभरात 207 बलात्काराचे गुन्हे, तर विनयभंगाचे 552 गुन्हे घडले आहे. गेल्या वर्षात घडलेल्या गुन्ह्याच्या तुलनेत बलात्काराच्या गुन्ह्यांत 15 टक्के तर विनयभंगाच्या गुन्ह्यात 14 टक्क्यांची वाढ झालीय. प्रजा या सामाजिक संस्थेनं केलेल्या सर्व्हेत हा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे. महिलांवरील अत्याचार, महिलांबाबतचे गुन्हे, अपघात आणि पोलीस दलातील रिक्त पदं याबाबत धक्कादायक माहिती समोर आलीय. माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार महिलांवरील गुन्ह्यात सतत वाढ होत असल्याचं स्पष्ट झालंय. प्रजा संस्थेच्यावतीनं मुंबईतील सर्व पोलीस स्टेशनमधून ही माहिती घेण्यात आली.

गुन्ह्यांमध्ये झालेली वाढ

2009-10 – बलात्काराच्या 171 घटना तर विनयभंगाच्या 384 घटना2010 – 2011 – बलात्काराच्या – 180 घटना तर विनयभंगाच्या 487 घटना2011-2012 – बलात्काराच्या – 207 घटना तर विनयभंगाच्या 552 घटना

म्हणजेच दर दिवशी एका महिलेवर बलात्कार होत असतो. तर दर दोन दिवसात तीन महिलांचा विनयभंग होत असतो.

सोन साखळी चोरीच्या घटना हि मोठ्या प्रमाणात शहरात घडत आहे. गेल्या वर्षी 2,134 सोनसाखळी चोरीच्याा घटना घडल्या होत्या. तर या वर्षी 1,775 सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या आहे. या घटनात महिलांचा काही कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं आहे.

दोन वर्षांपूर्वी अशीच माहिती गोळा करुन प्रजा संस्थेनं राज्य सरकारकडे सोपवली होती. पण त्याकडं गांभीर्यानं पाहिलं गेलं नाही. शहरातली ढासळती कायदा आणि सुव्यवस्था वेळीच सावरायची असेल, तर या माहितीचा वापर करुन सरकारनं योग्य पावलं उचलणं आवश्यक आहे.

close