‘शपथविधीचा वाद विनाकारण’

December 10, 2012 5:29 PM0 commentsViews: 5

10 डिसेंबर

मी उपमुख्यमंत्रीपदी पुन्हा विराजमान झालो तर आज विरोधकांनी शपथविधी घटनाबाह्य असं सांगता गोंधळ घातला पण राज्यात कोणी उपमुख्यमंत्री झालं नाही का? उपपंतप्रधान झालं नाही का? विदर्भाच्या मुद्दावर चर्चा करायच सोडून शपथविधीवर विनाकारण चर्चा सुरू केली आहे अशी टीका अजित पवार यांनी केली. तसेच अविश्वासबद्दल विरोधांची भूमिका डळमळीची आहे त्यांच्यातच समन्वय नाहीय एकट्या शिवसेनेनं तो मांडला आहे.पण भाजप,मनसे यांचा पुढाकार नगन्य आहे असा टोलाही पवारांनी लगावला. नागपुरात झालेल्या राष्ट्रवादीच्या सभेत ते बोलत होते.

आज राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला नागपूरमध्ये आजपासून सुरूवात झाली. पण पहिलाच दिवस गाजला तो उपमुख्यमंत्रीपदाच्या वादावरून अजित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. पण उपमुख्यमंत्रिपद हे घटनात्मक नाही, असा दावा विरोध पक्षनेते एकनाथ खडसेंनी केला. या विषयावर विधानसभेत वादळी चर्चा झाली. अखेर अध्यक्षांनी या वादावरचा निर्णय राखून ठेवला आणि शोक प्रस्तावाच्या चर्चेला सुरुवात केली. असाच प्रकार विधान परिषदेतही झाला. शेवटी सभापतींनी हस्तक्षेप केला आणि अजित पवारांची सभागृह नेता म्हणून मुख्यमंत्र्यांनी नियुक्ती केली आहे, असं म्हणत वादावर पडदा टाकला. पण विरोधकांनी सभात्याग करत आपला निषेध नोंदवला.

close