विलासरावांनी पाठवली गडकरींना नोटीस

December 20, 2008 6:44 AM0 commentsViews: 5

20 डिसेंबरविलासराव देशमुख यांनी, भाजप नेते नितीन गडकरी यांना नोटीस बजावली आहे. विलासरावांनी दोन हजार कोटी रुपयांचा, भ्रष्टाचार केल्याचा आरोप गडकरींनी केला होता. त्यानंतर ही नोटीस बजावण्यात आलीये. या नोटीसला अठ्ठेचाळीस तासात उत्तर द्यायला सांगण्यात आलं आहे.सायन-पनवेल रस्त्याची निविदा काढताना माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी भ्रष्टाचार केल्याचा जाहीर आरोप नितीन गडकरी यांनी केला होता. त्याला उत्तर देताना गडकरी यांनी वैयक्तिक आकसातून हा आरोप केला असून लवकरच त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे विलासरावांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार गडकरींना नोटीस पाठवण्यात आली आहे.गडकरींनी कोर्टात जाण्याची तयारी दाखवली आहे. विलासरावांनी मला नोटीस पाठवली असली तरी मला त्याची काळजी नाही. उलट हे टेंडर पुढे गेलं असतं, तर मीच कोर्टात गेलो असतो. माझी बाजू मी स्पष्ट केल्यानं माझी कोर्टात लढण्याची तयारी आहे" असं नितीन गडकरींनी आयबीएन लोकमतशी बोलताना सांगितलं. "सायन-पनवेल रस्ता आणि मुंबईच्या पाचही टोलनाक्यांची सुरक्षा वाढवणे हे दोन्ही वेगवेगळे निर्णय आहेत. मात्र विलासराव देशमुख यांनी हे दोन्ही प्रस्ताव एकत्र करून टेंडर काढलं आहे. त्याला कॅबिनेट सबकमिटीची मान्यता नाही. तरीही विलासराव देशुमखांनी हे टेंडर काढलं" असा आरोपही नितीन गडकरी यांनी आयबीएन लोकमतशी बोलताना केला.

close