तब्बल 82 वर्षांनंतर शिवरायांचं दुर्मिळ पत्र सापडलं

December 12, 2012 2:51 PM0 commentsViews: 206

12 डिसेंबरमहाराष्ट्राचा जानता राजा छत्रपती शिवाजी महाराजांचं एक दुर्मिळ पत्रं भारत इतिहास संशोधक मंडळाच्या दफ्तरात सापडलंय. हे पत्र अस्सल असून यावर शिवाजी महाराजांची राजमुद्रा आहे. शिवाजी महाराजाचं हे पत्र 1929मध्ये मंडळातल्या स. गं. जोशी यांना मिळालं होतं. त्यानंतर मंडळानं या पत्रातला मजकूर 1930 मध्ये शिवचरीत्र – साहित्य खंड 2 मध्ये प्रकाशित केला. त्यानंतर मात्र 1930 मध्ये हे पत्र गहाळ झालं होतं. आता तब्बल 82 वर्षांनंतर हे पत्र भारत इतिहास संशोधक मंडळाच्या दफ्तरात सापडलंय.

छत्रपती शिवाजी महाराजाचं अस्सल पत्र अत्यंत जिर्ण झाले असून त्यातील पंचात्तहर टक्के मंजकूर हा सध्याच्या परिस्थितीतही वाचता येतो. शाई जास्त लागल्यामुळे शिक्कामोर्तबाचे वाचन करता येत नाही. मात्र मोजमापा वरून ते शिवाजी महाराजाचे शिक्कामोर्तब आहेत हे सिध्द होते. खेड गावचा मोकदम भिकाजी गूजर यांना शिवाजी महाराजांनी हे पत्र लिहिलं होतं. रांजेगावच्या पाटलानं महिलेशी गैरवर्तन केल्यानं शिवाजी महाराजांनी त्याचे हात पाय तोडले, हा प्रसंग या पत्रात नमूद केलाय.

close