विद्या बालन अडकली लग्नाच्या बेडीत

December 14, 2012 11:52 AM0 commentsViews: 164

14 डिसेंबर

बॉलीवूडमध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री विद्या बालनचं आज लग्न झालं. सिद्धार्थ रॉय कपूरशी तिनं विवाह केला. काल अत्यंत साध्या पद्धतीनं तिची मेहंदी झाली. या मेहंदीला बॉलीवूडमधले सेलिब्रेटीजची फारशी उपस्थिती नसली तरी अभिनेत्री रेखा मात्र या सोहळ्याला आवर्जून उपस्थित होती.

ढोल-ताशांच्या गजरात विद्याचं लग्न झालं…नेहमीच हसत-मुख असणारी विद्या आज दुपारी बारा वाजता लग्नाच्या बंधनात अडकली. सब्यसाचीनं डिझाइन केलेली साडी, हलकासा मेकअप आणि चेहर्‍यावर हे मोठं स्माईल…नववधू विद्या या दिवसाची खूप मनापासून वाट पाहत होती. सिद्धार्थ जेव्हा विद्याला वरमाळा घालण्यासाठी पुढे आला तेव्हा विद्याचे थोडे लटके-झटके पहायला मिळाले. कारण इतक्या सहज विद्या गळ्यात वरमाळा घालणार नाहीये. हे सिद्धार्थही समजून चूकलाच असेल. वरमाळा गळ्यात घातल्यानंतर हे जोडपं दाक्षिणात्य पद्धतीनं लग्नविधी करण्यासाठी मंडपात गेलं. तुम्ही विश्वास ठेवा वा नका ठेवू…पण बॉलिवूडच्या आतापर्यंत झालेल्या लग्नांपैकी हे लग्न सगळ्यात वेगळं ठरलं. या लग्नसोहळ्याला आपण रिमिक्स सोहळाही म्हणू शकतो. कारण एकीकडे पंजाबी तालावर ढोल-ताशे वाजत होते. तर दुसरीकडे दाक्षिणात्य संगीत…इतकचं नाही तर गुलाबी पगडीत सगळी पुरूष मंडळी आणि साउथ इंडियन गेटअपमध्ये नटलेल्या सगळ्या स्त्रीया…हा आहे विद्याच्या लग्नसोहळ्याचा अनोखा नजराणा…पण विद्या बालनच्या या लग्नात निर्माता रॉनी स्क्रूवाला शिवाय एकही बॉलिवूड सदस्य नव्हता…सिद्धार्थ रॉय यूटीव्ही (UTV)चा सीईओ आहे..आणि विद्या बॉलिवूडची टॉपची अभिनेत्री.

खरंतरं शुक्रवारी सकाळपासून विद्याचं लग्न कुठं होणार यावर जोरदार चर्चा सुरू होती. कोणी म्हणत होतं की सकाळी साउथ इंडियन स्टाईलमध्ये विद्याचं लग्न होणार आणि संध्याकाळी पंजाबी रितीरिवाजानुसार…सकाळपर्यंत तर चेंबुरमंडळात विद्याचं लग्न होणार होतं. पण तिथं लग्नाची काहीच तयारी दिसली नाही. यावरून वाटत होतं की, ऐनवेळेला लग्नाची जागा बदलली असावीआणि मग बांद्राच्या ग्रीन गिफ्ट बंगल्यात वरातीची रेलचेल दिसली. लपतछपत लग्न करण्याचा विद्याचा प्लॅन दिसत होता. पण मीडियानं विद्या आणि सिद्धार्थला बरोबर गाठलं. फक्त जवळच्या नातेवाईकांनाच आमंत्रण दिलं होतं.

भटजीसुद्धा घाइघाइत रिक्षातून उतरताना दिसले. यावरूनचं लक्षात येतं की विद्याचं लग्न किती साधेपणानं झालं. विद्यानं सिद्धार्थबरोबरच्या नात्याला कधी हायप्रोफाईल होउचं दिलं नाही. दोन वर्षांपूर्वी विद्याची सिद्धार्थशी ओळख झाली. ती 'नो वन किल जस्सीका' च्या शूटच्या वेळेस…त्यानंतर विद्यासाठी सिद्धार्थनं 14 कोटींचा बंगला विकत घेतला. करण जोहरच्या पार्टीमध्ये, विम्बलडन टेनिस पाहण्यासाठी एकत्र जाणं…विद्याच्या तोंडून सारखं एसआरके चा उल्लेख…यावरूनचं वाटत होतं की 'ये रिश्ता बहोत कुछ केहलाता है' बॉलिवूडची आणखी एक अभिनेत्री लग्नाच्या बंधनात अडकलीये..आता फक्त वाट पाहायची ती लग्नानंतर विद्या मोठ्या पडद्यावर कधी दिसतेय ते…

close