भारत पाकव्याप्त काश्मीरमध्ये हवाई हल्ला करणार ?

December 20, 2008 7:51 AM0 commentsViews: 3

20 डिसेंबर मुंबई दहशतवादी हल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारत अनेक पर्यायांवर विचार करत आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये हवाईहल्ला करण्याची भारताची योजना असल्याची जोरदार चर्चा आहे. 'स्टार्टफोर' या आंतरराष्ट्रीय इंटलिजन्स एजन्सीच्या ताज्या अहवालात पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी कॅम्प नष्ट करण्यासाठी भारत हवाईहल्ला करू शकतो, असं म्हटलं आहे लष्कराला या हल्ल्यासाठी तयार राहण्याचे आदेश अगोदरच देण्यात आले आहेत. आता लष्कर केवळ पुढच्या आदेशाची वाट पाहत असल्याचं या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे.दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी पाकिस्तानला थोडा अवधी देण्याचा भारताचा विचार असल्यामुळं हवाई हल्ल्यासाठी वाट पाहण्याचा मार्ग भारतानं स्वीकारला असल्याची माहितीही या रिपोर्टमध्ये देण्यात आलीय. या हल्ल्यानंतरही दहशतवादाचा नायनाट करणं शक्य नाही याची जाणीव भारताला आहे. मात्र या कारवाईमुळं दहशतवाद्यांना मदत करण्याच्या पाकिस्तानच्या प्रयत्नांना खिळ बसण्याची शक्यता आहे, असं भारताला वाटत असल्याचं या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे. परराष्ट्र व्यवहारमंत्री प्रणव मुखर्जी यांनीही, काल भारतापुढं सगळे खुले असल्याचं वक्तव्य केलं होतं.

close