शेतकर्‍यांवर जळालेली पिकं तोडण्याची नामुष्की

December 25, 2012 11:20 AM0 commentsViews: 19

25 डिसेंबरऐन हिवाळ्यातच मराठवाड्याला दुष्काळाच्या झळा बसत आहे. मराठवाड्यातील 3299 गावांची अंतिम आणेवारी 50 पैशांपैक्षा खाली आली आहे. पिक-पाण्याअभावी परिस्थीती बिकट बनलीये. पण त्यातही सर्वात जास्त दुष्काळाच्या झळा बसल्यात त्या जालना जिल्ह्याला… कारण अख्खा जालना जिल्हा दुष्काळग्रस्त झालाय. पिक-पाण्याअभावी गावं च्या गावं ओस पडली आहेत. शेतातील उभी पिकं पाण्याअभावी सुकून गेली. दुष्काळात शिवारात कामं उरली नसल्यामुळे हातावर पोट भरणार्‍यांचीही उपासमार होतेय. हिवाळ्यात ही परिस्थिती आहे तर पुढे काय ? हा प्रश्नं आता सगळ्यांसमोर उभा राहिला.तसंच पाण्याच्या भीषण टंचाईनं जालना जिल्ह्यातील मोसंबीच्या बागा अखेरच्या घटका मोजताय. या जिल्ह्यातील अर्ध्या बागा पाणी नसल्यानं जळाल्या तर शिल्लक बागा स्वत: शेतक-यानं तोडायला सुरुवात केलीय. या नगदी पीकानं यंदा शेतकर्‍याच्या डोळ्याचं पार पाणी पळवलंय.

close