राज्यसभेत बोलू न दिल्यामुळे जया बच्चन भडकल्या

December 18, 2012 1:07 PM0 commentsViews: 10

18 डिसेंबर

दिल्लीत झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणाचे पडसाद संसदेत उमटले. देशभरात महिलांवरच्या अत्याचाराच्या घटनांबाबत लोकसभा आणि राज्यसभेत चर्चा झाली. अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी कायदे कठोर करा असी मागणी सर्वपक्षीय महिला खासदारांनी केली. तर महिला संघटनांनी याविरोधात निदर्शनं केली. दरम्यान, संसदेत महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्वावर आपली भूमिका मांडण्यासाठी आग्रही असलेल्या खासदार जया बच्चन यांना वेळेच्या अभावी सभापतींंनी बोलू दिलं नाही. त्यामुळे जया बच्चन सभापतींवर चांगल्याच भडकल्या.

close