दूषित पाणी प्यायल्यानं 200 माकडांचा मृत्यू

December 27, 2012 11:26 AM0 commentsViews: 56

27 डिसेंबरमराठवाड्यात दुष्काळानं आता बळी घ्यायला सुरूवात केलीये. उस्मानाबाद जिल्ह्यात दूषित पाणी प्यायल्यानं 200 पेक्षा जास्त माकडांचा मृत्यू झालाय. परांडा तालुक्यातल्या सोनारी गावातली ही घटना आहे. गावात दुष्काळामुळे पाण्याचे साठे आटले आहेत इतर कुठेही पाणी नसल्यामुळे माकडं देवस्थानातल्या कुंडात पाणी पिण्यासाठी गेले पण ते पाणी दूषित होतं. त्यामुळे माकडांचा मृत्यू झाला. पशुवैद्यकीय अधिकार्‍यांनीही घटनेची दखल घेत पंचनामा केला. दूषित पाण्यामुळंच माकडंाचा मृत्यू होत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय.

close