वर्ल्ड सुपर सीरिजमधून सायना नेहवाल बाहेर

December 20, 2008 9:04 AM0 commentsViews: 2

20 डिसेंबरवर्ल्ड सुपर सीरिजच्या सेमी फायनलमध्ये सायना नेहवालला पराभव पत्करावा लागला आहे. तिसर्‍या सिडेड चेंग वँगकडून सायना 21-15, 14 – 21आणि 16 – 21 अशी पराभूत झाली. बीजिंग ऑलिंम्पिकमध्ये सायनाने वँगला हरवलं होतं. पण आज सायनाचे प्रयत्न अपुरे पडले.आपला लढाऊ बाणा दाखवताना सायनानं दाखवून दिला. पहिला गेम तिने 21-15 असा जिंकला. पण दुसर्‍या गेममध्ये वँगने जोरदार कमबॅक केलं. हा गेम तिने 21 – 14 ने जिंकला. मध्ये मध्ये सायना आपल्या खेळाची चुणूक दाखवत होती. पण तिचा अनुभव कमी पडला. अखेर 41 मिनिट चाललेल्या मॅचमध्ये तिचा पराभव झाला.

close