घोडे विक्रीसाठी प्रसिद्ध सारंगखेडच्या यात्रेला सुरूवात

December 28, 2012 11:29 AM0 commentsViews: 15

28 डिसेंबर

घोड्यांच्या खरेदी विक्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या नंदुबार जिल्ह्यातील सारंगखेड्याच्या यात्रेला सुरुवात झाली आहे. देशभरातून या यात्रेत घोडे खरेदी आणि विक्रीसाठी गर्दी झाली आहे. आतापर्यंत 170 घोड्यांच्या विक्रीतून जवळपास 50 लाखाची उलाढाल झाली आहे. गेल्या वर्षी या यात्रेत घोडे विक्रीत जवळपास 3 कोटीची उलाढाल झाली होती. यंदा मागणी वाढल्यानं हा आकडा पार केला जाईल असं घोडे व्यावसायीकांचं म्हणणं आहे. दत्तजयंतीला भरणारी ही यात्रा पुढचे 8 दिवस असते.

close