मोहाली टेस्टमध्ये भारताची मोठ्या स्कोअरकडे वाटचाल

December 20, 2008 9:11 AM0 commentsViews: 2

20 डिसेंबर, मोहालीमोहाली टेस्टमध्ये गौतम गंभीर आणि राहुल द्रविडच्या शानदार बॅटिंगमुळे भारताने साडे तीनशे रन्सचा टप्पा आरामात ओलांडला. पण लंचनंतर मात्र पुढच्या चार विकेट झटपट गमावल्यात. लंचनंतर चौथ्याच ओव्हरमध्ये सेंच्युरियन गौतम गंभीर आऊट झाला. स्वॉनच्या एका बॉलवर त्याचा ड्राईव्ह फसला आणि बॅकवर्ड शॉर्टलेगवर त्याने कूकच्या हातात कॅच दिला. पण त्यापूर्वी त्याने 179 रन्स केले. यात त्याने तब्बल 25 फोर आणि एक सिक्स मारला. गंभीरने या वर्षांतले एक हजार टेस्ट रन्सही आज पूर्ण केले. राहुल द्रविड बरोबर दुसर्‍या विकेटसाठी त्याने 314 रन्सची पार्टनरशिप केली. दुसर्‍या बाजूने द्रविडनेही आपली 26वी टेस्ट सेंच्युरी ठोकली. द्रविडलाही स्वॉननेच आऊट केलं. त्याने 136 रन्स केले. द्रविड पाठोपाठ सचिन अकरा रन्स करुन आऊट झाला. तर लक्ष्मणही लगेच पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याला खातंही खोलता आलं नाही. इंग्लंडतर्फे स्वॅनने तीन विकेट्स घेतल्या.

close