आघाडीत ‘नंबर 1′ वरून जुंपली

December 28, 2012 5:38 PM0 commentsViews: 2

28 डिसेंबर

राज्यात आणि केंद्रात सत्तेत एकत्र असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीत पुन्हा एकदा जुंपली आहे. राष्ट्रवादीला राज्यात नंबर एकचा पक्ष बनवण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागलं पाहिजे असे आदेश अजित पवार यांनी आज राष्ट्रवादीच्या मुंबई कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी दिले. त्यानंतर इंदू मिलचा प्रश्न राष्ट्रवादीनं आधी उचलला आणि काँग्रेसनं त्याचं श्रेय घेतलं अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनी केली. शरद पवारांनी आदेश दिले तर राज्यातल्या सर्व निवडणुका स्वबळावर लढण्यासाठी सज्ज असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यानंतर मात्र काँग्रेसच्या वचनपूर्ती मेळाव्यात माणिकराव ठाकरे यांनी राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली. इंदू मिलचा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी दिल्लीत जाऊ सोडवला, पण चांगल्या कामाचं कौतुक राष्ट्रवादी करणार नाही असा टोला त्यांनी लगावला. तसंच गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीनं जास्त जागा घेऊनही त्यांना त्या जिंकता आल्या नाहीत, याची आठवणही माणिकरावांनी करुन दिली.

close