जंतरमंतरवर शीला दीक्षितांना आंदोलकांचा घेराव

December 29, 2012 12:59 PM0 commentsViews: 6

29 डिसेंबर

जंतरमंतरवर आंदोलक पीडित मुलीला श्रद्धांजली वाहण्यासाठी जमलेत. तिथे श्रद्धांजली वाहण्यासाठी दिल्लीच्या मुख्यमंत्री शिला दीक्षित गेल्या होत्या. त्यावेळी आंदोलकांच्या रोषाचा मुख्यमंत्री शिला दीक्षित यांना सामना करावा लागला. आंदोलकांनी शीला दीक्षित यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. परिस्थिती ओळखून अखेर शीला दीक्षितांना काढता पाय घ्यावा लागला. पण दीक्षित यांनी मेणबत्ती पेटवून पीडित तरूणीला श्रद्धांजली वाहिली.

close