नाशिकमध्ये बबनराव पाचपुतेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन

December 29, 2012 1:43 PM0 commentsViews: 10

29 डिसेंबर

नाशिक जिल्ह्यातल्या सुरगाणा आदिवासी आश्रम शाळेतल्या विद्यार्थिनीवर बलात्कार प्रकरणाचा निषेध करण्यात आला. शहरातील आदिवासी विकास भवनावर सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. आदिवासी विकास मंत्री बबनराव पाचपुते यांचा प्रतिकात्मक पुतळाही यावेळी जाळण्यात आला. बलात्कारानंतर आदिवासी आयुक्तांच्या वादग्रस्त विधानाचाही यावेळी निषेध करण्यात आलाय. यावेळी आंदोलकांनी आदिवासी विकास आयुक्तांवर कारवाई करण्याची मागणी केली.

close