बॉलिवूडचा कँडल मार्च

December 29, 2012 4:57 PM0 commentsViews: 4

29 डिसेंबरमुंबईत अनेक सामाजिक संघटनांनी कँडल मार्चचं आयोजन केलंय. तिथे बॉलिवुडमधल्या अनेक बड्या कलाकारांनी सहभाग नोंदवला. यावेळी हेमा मालिनी, जया बच्चन, जावेद अख्तर,शबाना आझमी आदी कलाकार उपस्थित होते. यावेळी जया बच्चन यांना अश्रू अनावर झाले, त्या म्हणाल्या, मी देशातील महिला,बंधू, वडिलधार्‍यांना माफी मागते ज्यांना आजच्या पिढीत अशी घटनेला सामोरं जावं लागलं. आम्ही डोळे बंद केले, किंवा आपण तिला विसरून गेलो मी आपल्याला ग्वाही देत भविष्यात असा प्रकार घडू देणार नाही असं सांगत जया बच्चन यांना अश्रू अनावर झाले.

close