तरूणाईच्या संतापाचं असंही दर्शन

December 29, 2012 1:54 PM0 commentsViews: 3

29 डिसेंबर

पीडित मुलीच्या निधनानंतर आज दिवसभर जंतरमंतरवर तरुणांनी शांतपणे निदर्शनं केली. दिवसभरात तरुणांनी वेगवेगळ्या पद्धतींनी आंदोलनं केली. मुलीला न्याय मिळालाच पाहिजे.. अशा घटना पुन्हा घडू नयेत, म्हणून कायदे कठोर करावेत, अशा अनेक मागण्या तरुणांनी शांतपणे केल्या. या मुलीच्या संघर्षाला सलाम करण्यासाठी मोठ्या प्रमाणात तरुण जंतरमंतर मैदानावर जमा झाले. आज दिवसभर अत्यंत शांततेत ही निदर्शनं पार पडली. दिल्लीतली अनेक महत्त्वाची मेट्रो स्थानकं आज बंद ठेवण्यात आली होती. इंडिया गेटजवळ कुणी जाऊ नये, म्हणून संपूर्ण परिसरात कडक बंदोबस्त लावण्यात आला होता.

close